कुख्यात गुंड निलेश घायवळला दणका ; ‘घायवळ ‘च गायवळ’ करणं पडलं महागात, पोलीस आयुक्तांनी दिले थेट कारवाईचे आदेश..

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड आणि कोथरूड गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश घायवळ याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.नीलेश घायवळ याची ‘गायवळ’ नावाचा उल्लेख असलेली कागदपत्रे पोलिसांना सापडली असून, तेच त्याचे खरे आडनाव आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या प्रकरणी आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घायवळचा पासपोर्टच रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

कुख्यात गुंड निलेश गायवळ पोलिसांना चकवा देत लंडनला पळून गेला. विशेष म्हणजे त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला याविषयी पोलीस प्रशासनावरच ताशेरे ओढले जात होते.अशातच आता पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये अहिल्यानगर मधील आपल्या गावच्या पत्त्यावर त्यांने पासपोर्ट काढला. विशेष म्हणजे पासपोर्टसाठी त्यांने आपल्या आडनावात देखील बदल केला’ घायवळ’ ऐवजी’ गायवळ ‘नावाची कागदपत्रे त्यांन सादर केली. गायवळ आडनाव असूनही त्याने पुणे पोलिसांत गुन्हा दाखल झाला तेव्हा स्वतःचे नाव ‘घायवळ’ असे सांगून पोलिसांची दिशाभूल केली. तेव्हापासून तो सर्वांचीच दिशाभूल करीत आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांकडून घायवळचा शोध घेतला जात असताना, तो ११ सप्टेंबरपासूनच परदेशात असल्याची माहिती समोर आली. ‘मकोका’च्या एका गुन्ह्यात जामीन देताना न्यायालयाने त्याला पासपोर्ट जमा करण्याची सूचना केली होती. तो पासपोर्ट काढताना त्याने ‘गायवळ’ नावाने प्रक्रिया केल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीला त्याने बनावट नावाने पासपोर्ट काढला, अशी चर्चा झाली. मात्र, पुणे पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात आधार कार्ड आणि त्याची काही अन्य कागदपत्रे मिळाली. त्यात ‘नीलेश गायवळ’ असे त्याचे नाव असल्याचे दिसून आले, अशी माहिती समोर आली आहे

घायवळने खोट्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळवला आहे. त्यामुळे आत्ता त्याचा पासपोर्ट रद्द करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे आडनावात बदल करणे घायवळला चांगलेच महागात पडल आहे.