कुख्यात गुंड निलेश घायवळला पोलिसांचा मोठा धक्का ; बँक खाती, पासपोर्टनंतर आता ऊसाच्या शेतात लपवलेली कार…


पुणे: पुण्यातील फरार गुंड निलेश घायवळविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा फास अधिकच घट्ट केला आहे.आधी बँक खाती गोठवून पोलिसांनी घायवळची आर्थिक नाकेबंदी केली. तर, दुसरीकडे पासपोर्ट रद्द करून आणखी एक दणका दिला. त्यानंतर आता आणखीन एक मोठा धक्का देत पोलिसांनी घायवळची आणखी एक आलिशान कार उसाच्या शेतात लपलेली जप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश घायवळची आणखी एक आलिशान कार उसाच्या शेतात लपवून ठेवण्यात आली होती. ती पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही कार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातल्या खर्डा गावात लपवून ठेवण्यात आली होती. ‘8055 BOSS’ अशी नंबर प्लेट असलेली ही गाडी थेट पुणे पोलिसांनी जाऊन जप्त केली. त्यामुळे घायवळला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान याआधी पोलिसांनी निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांची एकूण 10 बँक खाती गोठवली आहेत. या खात्यांमध्ये 38 लाख 26 हजार रुपये असल्याचे तपासात समोर आले. निलेश घायवळ, शुभांगी घायवळ, स्वाती निलेश घायवळ, कुसुम घायवळ, ‘पृथ्वीराज एंटरप्रायजेस’ यांच्या खात्यांचा समावेश आहे. या खात्यांवरील व्यवहारांसाठी आता पुणे पोलिसांची नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्यामुळे या खात्यातून पैसे काढणे किंवा व्यवहार करणे पूर्णपणे थांबले आहे. त्यामुळे घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!