कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी अजित पवारांच्या भेटीला; पुण्याच्या निवडणुकीत’ तिसरी गॅंग ‘उतरणार?

पुणे :पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच जेलमधून सुटका झाली होती.अशातच आता गजा मारणेची पत्नी आणि माजी नगरसेविका जयश्री मारणे या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला पोहोचल्या आहेत.त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी तिकीट देणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी, गजा मारणे टोळी तसेच घायवळ टोळीविरुद्ध कारवाई केल्यानंतर या टोळीतील सदस्य आता राजकारणाकडे वळत असल्याच दिसून येत आहे कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नी जयश्री मारणे अजित पवारांच्या भेटीसाठी बारामती हॅास्टेलला पोहोचल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे
गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे या माजी नगरसेविका राहिल्या आहेत. जयश्री यांनी 2012 साली पुण्यामध्ये कोथरुडमधून पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. यावेळेस त्या मनसेच्य़ा तिकिटावर निवडूनही आल्या होत्या. आता 2022 मध्ये जयश्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अशातच आता त्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत उभा राहण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी पंगा घेतल्याने गजा मारणे याची तुरूंगात रवानगी झाली होती. अशातच आता गजा मारणे राजकीय मंजावर देखील आपली ताकद दाखवण्याची तयारी करत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी संधी देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.