कुख्यात गुंड आंदेकरचा मास्टरप्लॅन ;’ ती’ संधी साधून सोमवारी पुन्हा जेलमधून बाहेर येणार?


पुणे :आगामी पुणे महापालिका निवडणूकीसाठी कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबाने रिंगणात उडी घेतली आहे.आता गँगवॉर भडकवणाऱ्या या बंडू आंदेकरने नवा खेळ सुरू केला आहे. काल आंदेकर कुटुंबातील तिघं सदस्य भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले होते. मात्र त्यानीं अर्धवट अर्ज भरलेले असल्याने ते स्वीकारण्यात आले नाहीत. ते तिघे आता उद्या पुन्हा अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते सोमवारी पुन्हा जेलमधून बाहेर येणार आहेत.

आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकर याने पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी न्यायलयाकडून परावानगी घेतली होती. न्यायलयाच्या परवानगीनंतर शनिवारी बंडू क्षेत्रिय कार्यालयात आला अन् मोक्कार घोषणाबाजी केली. मात्र, बंडूने आपला गेम प्लॅन सुरू केला आहे. यामध्ये लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकर यांनी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले. मात्र, पण त्यांचे अर्ज अर्धवट भरलेले होते.

दरम्यान बंडू आंदेकरसह तिघांचेही अर्ज बाद करण्यात आल्याने आता वनराजच्या पत्नीने देखील बंडूच्या पावलावर पाऊल टाकून जेलमधून बाहेर येण्याचा मास्टरप्लॅन तयार केला आहे. आंदेकर कुटुंबातील बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर हे प्रभाग क्रमांक २२, २३ व २४ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.आता ते पुन्हा अर्ज भरण्यासाठी जेलमधून बाहेर येणार आहेत.

       

दरम्यान ‘नेकी का काम, आंदेकर का नाम’, ‘आंदेकरांना मत, विकासाला मत’ अशी घोषणाबाजी आंदेकरने केली. या तिघांना अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. त्यानुसार काल दुपारी पोलिस बंदोबस्तात अर्ज दाखल केला. पण पुन्हा एकदा त्याने जेलमधून बाहेर येण्यासाठी डाव साधला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!