पुणेकरांनो लक्ष द्या! फक्त दंड नाही तर गाडीच जप्त होणार, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात आता पोलीस आक्रमक…


पुणे : पुण्यात वाहतूक नियम मोडल्यास आता फक्त दंड नाही तर गाडीच जप्त होणार आहे. पुण्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी पुणे पोलिसांनी आता ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे.

मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 1000 हून अधिक चालकांसाठी सोमवारी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात एका विशेष समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मद्यपी वाहनचालकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मद्यपी वाहनचालकांसाठी नवीन आणि अत्यंत कडक नियमावली जाहीर केली आहे. सोमवारी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आयोजित समुपदेशन शिबिरात त्यांनी स्पष्ट केले की, यापुढे केवळ दंड आकारून सोडले जाणार नाही, तर थेट वाहन जप्त केले जाईल.

रस्ते सुरक्षा महिन्याचा भाग म्हणून हे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. ‘टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी आता ‘सोशल शेमिंग’ आणि कडक कायदेशीर कारवाईचा अवलंब केला आहे. मद्यधुंद अवस्थेत सापडल्यास संबंधिताचे वाहन तात्काळ जप्त केले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना त्यांच्या मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत चौकाचौकात उभे केले जाईल.

तसेच नियम भंग करणाऱ्यांचे फोटो पुणे पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले जातील, जेणेकरून समाजात धाक निर्माण होईल. संबंधित चालक जिथे काम करतो, त्या कार्यालयालाही या गुन्ह्याबाबत अधिकृतपणे कळवले जाईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!