भारतात नाही, अखेर अमेरिकेत मोदींनी घेतली पहिली पत्रकार परिषद; वापरले टेलिप्रॉम्प्टर..


नवी दिल्ली : सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही.

पण अमेरिका दौऱ्या दरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे ते चर्चेत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ९ वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या काळात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. एकदा यासाठी प्रयत्न झाला होता पण त्यावेळी ते पत्रकारांशी बोलले नव्हते. त्यामुळे पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख होती.

पण काल त्यांनी अमेरिकेत पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेसाठीही मोदींकडून फक्त एक दिवस आधी परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे. पत्रकार परिषदेत बोलतानाही मोदींच्या समोर टेलिप्रॉम्प्टर लावले होते. त्यामुळे विरोधकांनीही मोदींवर टीका केली आहे.

पत्रकार परिषदेत काय म्हणाले मोदी?

भारतीतील धार्मिक असहिष्णुता, जातीय भेदभाव आणि भाषण स्वातंत्र्यावर दबाव आणण्याच्या पत्रकाराच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, “अमेरिकन लोकांकडून प्रश्न विचारण्यात आलेली लोकशाही मूल्यांप्रती भारताची वचनबद्धता ऐकून मला ‘खरोखर आश्चर्य’ वाटले.

लोकशाही आमच्या डीएनएमध्ये आहे, आम्ही लोकशाही जगतो आणि ती आमच्या संविधानाच्या रूपात आहे. आम्ही जात, वंश, धर्म, लिंगभेद करत नाही. त्यामुळे भेदभावाचा मुद्दाच राहत नाही. असं बोलून पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेत भारतीय लोकशाहीचा बचाव केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!