‘मूल होत नाही’ ‘रिक्षा खरेदीसाठी माहेरून पैसे आण…; सासरच्या जाच ; विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर वारंवार विवाहितेच्या आत्महत्या घटना पुण्यातून समोर येत आहेत. अशातच आता सासरच्या जाचाला कंटाळून हडपसर परिसरातील शेवाळवाडी येथे एका २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पूनम युवराज लष्करे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. या विवाहितेला सासरची मंडळी वारंवार त्रास द्यायची.’मूल होत नाही’ ‘रिक्षा खरेदीसाठी माहेरून पैसे आण’ या मागणीसाठी या तरुणीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. अखेर या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली.या घटनेनंतर पूनमच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली.
पूनमचा विवाह युवराज लष्करे या रिक्षाचालकासोबत झाला होता. लग्नानंतर काही काळ लोटल्यानंतरही मूल होत नसल्याने सासरच्या मंडळींनी तिला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. तिची सासू, सासरे आणि आजेसासू हे सातत्याने तिला टोचून बोलत असत आणि तिचा छळ करत होते. अखेर या त्रासाला कंटाळून तिने ही टोक उचललं.

दिलेल्या फिर्यादीनंतर फुरसुंगी पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तारा लष्करे, संतोष लष्करे, बायडाबाई या तिघांनाही अटक केली आहे. पूनमचा पती युवराज लष्करे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा अधिक तपास करत आहेत.

