नितीश कुमार यांना व्हाट्सअँपवरून जीवे मारण्याची धमकी…!
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना व्हॉट्सअॅपवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. धमकी प्रकरणी पाटणा सचिवालय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला पाटण्यात आणण्याची तयारी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहार पोलिस आणि गुजरात पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आरोपी तरुणाला सुरतच्या लाना येथून अटक करण्यात आली.अंकित मिश्रा असे धमकी देणा-या आरोपीचे नाव आहे. त्याला सुरतमधील लस्करा येथून अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी बिहार पोलिस सुरतला पोहोचले होते. सुरत पोलिस या संपूर्ण प्रकरणावर थोड्याच वेळात पत्रकार परिषदही घेऊ शकतात. मात्र, एडीजीपी मुख्यालय आणि पाटणा एसपी या संपूर्ण प्रकरणावर काहीही सांगण्यास तयार नाहीत.
Views:
[jp_post_view]