Nitin raut Car Accident : मोठी बातमी! प्रचारावरुन घरी परतत असताना नितीन राऊत यांच्या कारला अपघात…


Nitin raut Car Accident : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात एकाच दिवशी २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल जाहीर होईल.

त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री आणि नागपूर उत्तरचे उमेदवार नितीन राऊत यांच्या कारचा अपघात झाला आहे. सुदैवाने नितीन राऊतांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

काल रात्री प्रचार सभा संपवून घरी परतत असताना नागपुरातील ऑटोमोटिव्ह चौकात त्यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. सुदैवाने नितीन राऊत आणि त्यांचे सहकारी यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. या अपघातामुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, राऊत यांच्या कारला ट्रकने इतकी जोरात धडक दिली की कारमधील सर्व प्रवासी थोडक्यात बचावले. घटनास्थळी पोलिसांची यंत्रणा तात्काळ पोहोचली आणि ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे, आणि पोलिसांच्या टीमद्वारे अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. नितीन राऊत हे प्रचार दौऱ्यावर असताना या अपघातामुळे त्यांच्या गाडीत मोठे नुकसान झाले, मात्र ते सुदैवाने सुरक्षित आहेत. त्यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आणि अपघातानंतर ते ताबडतोब घरी पोहोचले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!