नितेश राणेंचं मोठे विधान; म्हणाले, महायुती सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात, अन्य धर्मियांनी….


मुंबई : राज्यातील महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात आहे, अन्य धर्मियांनी मतदान केलं नाही असं वक्तव्य राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं. मोहल्लात फिरलात पण तुम्हाला त्यांचे मतदान झाले नाही असंही ते म्हणाले आहे.

हिंदू समाजानेच आम्हाला सत्तेत बसवलं, त्यामुळे हिंदू समाजाची सेवा करणे, त्यांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे असं नितेश राणे म्हणाले. रत्नागिरीतील चिपळूणमधील रक्षाबंधनानिमित्त राखी संकलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात नीतेश राणे म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारला सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाने पाठिंबा दिला. इतर धर्मीयांनी आम्हाला मतदान केले नाही. त्यामुळे हिंदू समाजाची सेवा आणि संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. तुम्ही मोहल्ल्यांमध्ये फिरूनही त्यांचे मत मिळाले नाही, असा दावा त्यांनी केला.

नीतेश राणे यांनी महिलांच्या सुरक्षेवरही भर दिला. ते म्हणाले, केवळ विकास करून उपयोग नाही, कारण जर राज्यातील महिला सुरक्षित नसतील, तर त्या विकासाला काहीच अर्थ नाही. लव्ह जिहादसारख्या घटना घडत असताना हिंदुत्ववादी सरकारची गरज का आहे, हे लक्षात येते. लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी हिंदुत्ववादी सरकार असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, रक्षाबंधन निमित्त आयोजित केलेल्या राखी संकलन उपक्रमाचे महत्त्व सांगताना राणे म्हणाले की, जिहादच्या नावाखाली आपल्या माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहिले जाते, त्याला राखी संकलन हे योग्य उत्तर आहे. या कार्यक्रमात १४ हजार राख्या संकलित करून त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवल्या गेल्या. या उपक्रमामुळे हिंदुत्व अधिक भक्कम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!