Nirmala Sitharaman : मोठी बातमी! अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या विरोधात खंडणीच्या आरोपांखाली FIR दाखल करण्याचे आदेश, नेमकं काय घडलं?


Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपांखाली एफआयआर दाखल करण्याचे आदेश बंगळुरूच्या विशेष न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. बंगळुरूतील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने ही एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने दिलेले हे आदेश इलेक्टोरल बाँडद्वारे खंडणीच्या आरोपांसंदर्भात देण्यात आला आहे. जनाधिकार संघर्ष संघटनेचे आदर्श अय्यर यांनी निर्मला सीतारामन आणि इतरांविरोधात वैयक्तिक तक्रार (पीसीआर) दाखल केली होती.

पीसीआरमध्ये इलेक्टोरल बाँडद्वारे खंडणीचा आरोप करण्यात आला होता. याचप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यालक एफआयआर दाखल करण्याचे आदेश विशेष न्यायालयानं दिले आहेत. हे आदेश 42 व्या एसीएमएम कोर्टानं जारी केले आहेत. टिळक नगर पोलीस आता निर्मला सीतारामन आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल करणार आहेत. Nirmala Sitharaman

दरम्यान, केंद्र सरकारनं २०१८ मध्ये निवडणूक रोखे म्हणजेच, इलेक्टोरल बाँड योजना सुरू केली होती. याचा उद्देश राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या रोख देणग्यांची जागा घेणं हा होता. राजकीय पक्षांच्या निधीमध्ये पारदर्शकता सुधारली जावी.

राजकीय पक्षांना इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून निधी दिला जात होता. मात्र, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, त्यानंतर विरोधकांनी केलेले आरोप आणि याचिका पाहता सर्वोच्च न्यायालयानं ते रद्द केले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!