Nira Bhima Sugar : छत्रपती पाठोपाठ नीरा भीमाने फोडली दराची कोंडी, जाहीर केला पहिला हप्ता


Nira Bhima Sugar : निरा भिमा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी २७०० प्रतिटन ऊसाला पहिला हप्ता जाहीर केला आहे. हा पहिला हप्ता असून पुढील हप्ते इतर कारखान्यांमध्ये देण्याची कारखान्याने घोषणा केली आहे. या संदर्भात कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, या चालू गृहीत हंगामामध्ये सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून त्या दृष्टीने कारखान्याची ऊसतोड व वाहतुकीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना या गळीत हंगामात इतर कारखान्याच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊस दर देणार आहे.

या गळीत हंगामामध्ये उसाची सर्व बिले, तोडणी वाहतूकदारांची बिले नियमितपणे देण्याची योजना करण्यात आली असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी इतर कोणत्याही आमिषाला बळी पडू नये व आपला ऊस निराभिमा कारखान्यालाच गाळपासाठी द्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!