निमिषा प्रियाला फाशी होणार!! सरकारचे प्रयत्न ठरले अपयश? भारताला थेट हस्तक्षेप करणे अशक्य, केंद्र सरकारची माहिती…


नवी दिल्ली : येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रिया यांना होणाऱ्या फाशीपासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने सर्व शक्य प्रयत्न केल्याचे आज सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. आता सरकारकडे काही करण्यासाठी फारसा वाव उरलेला नाही. येमेनमध्ये भारताचे औपचारिक राजनैतिक प्रतिनिधित्व नाही, असेही सांगण्यात आले आहे.

निमिषा प्रिया या केरळ येथील असून 2008 पासून येमेनमध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या. त्या येमेनमध्येच राहून एका स्थानिक नागरिकासोबत नर्सिंग होम चालवत होत्या. 2017 मध्ये स्थानिक येमेन नागरिक तलाल अब्दो मेहदी याच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती.

आरोपामध्ये त्या मृतदेहाचे तुकडे करून अंडरग्राउंड टाकीत टाकल्याचा आरोप आहे. निमिषाने मात्र सांगितले की, हा प्रकार आत्मरक्षणासाठी केला गेला. तिच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्ती तिच्यावर शारीरिक अत्याचार करत होता. यामुळे याबाबत तपास सुरू आहे.

नंतर तिचा पासपोर्ट काढून घेतला होता. सध्या निमिषा प्रिया सना सेंट्रल तुरुंगात बंद आहे. तिची फाशी 16 जुलै 2025 रोजी निश्चित करण्यात आली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात अंतिम अपील देखील फेटाळण्यात आले. यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, खासगी प्रयत्न सुरू असून, त्याचा परिणाम काय होईल हे सांगता येत नाही. ही घटना भारतासाठी आणि विशेषतः परदेशात कार्यरत भारतीय महिलांसाठी एक गंभीर मुद्दा बनली आहे. याबाबत केरळचे मुख्यमंत्री देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपर्कात असून याबाबत मागणी करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!