Nilesh Rane : निलेश राणे यांना मोठा धक्का! डेक्कन परिसरातील मालमत्ता पुणे महापालिकेकडून सील, काय आहे कारण?
Nilesh Rane : पुणे महापालिकेने मालमत्ता कर न भरल्याने भाजप नेते निलेश राणे यांची मालमत्ता सील केली आहे. यामुळे निलेश राणे यांना मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.
पुणे महापालिकेतून मिळालेल्या माहितीनुसार, निलेश राणे यांची तब्बल ३ कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. ही थकबाकी न भरल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यातील डेक्कन भागात राणे यांची मालमत्ता आहे. डेक्कन या ठिकाणी असलेल्या व्यावसायिक जागेचा कर निलेश राणे यांनी न भरल्यामुळे संबंधित मालमत्ता महापालिकेने सील केली आहे. Nilesh Rane
दरम्यान, सध्या महापालिकेकडून कर वसुली केली जात आहे. निलेश राणेंच्या मालमत्ता थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आजच कारवाई केली आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये अनेक जणांनी मालमत्ता कर थकवला आहे.
त्यामुळे जर निर्धारित वेळेत करणे भरला नाही भरला तर थकबाकीदारांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देखील महापालिकेने आजच्या कृतीतून दाखवली आहे.
भाजप नेते निलेश राणेंच्या मालमत्तेची तब्बल तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची थकबाकी आहे. सध्या महापालिकेकडून कर वसुली केली जात आहे. राणेंच्या मालमत्ता थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आजची कारवाई केली आहे.