पुण्यात माथाडी कामगार जिल्हा अध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या ; घटनेने खळबळ…!


पुणे : पुण्यातून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. शिंदे गटातील निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना काल घडली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार , बुधवारी विष प्राशन केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आत्महत्याचे कारण अजून समजू शकले नाही. कौटुंबिक वादातून ही आत्महत्या केल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

अद्याप निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे. सध्या पुणे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

निलेश माझिरे हे पुण्यातील माथाडी जिल्हा अध्यक्ष असून, त्यांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र’ करत जवळपास ४०० कार्यकर्त्यांना सोबत घेवून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!