Nilesh Lanke : पार्थ पवार यांच्यानंतर आता कुख्यात गुंड गजा मारणेकडून निलेश लंकेंचा सत्कार, पुण्यात घेतली भेट…


Nilesh Lanke : अहमदनगर लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके वादात अडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील या खासदाराने गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे. त्यानंतर निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे.

लंकेंची ही भेट वादात पडण्याची शक्यता आहे. यापूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार याला फटकारले होते, असे अजिबात घडता काम नये, असे बजावले होते. Nilesh Lanke

खासदार निलेश लंकेंनी गुरुवारी कुख्यात गुंड गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला. निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. यामुळे यावरुन आता राजकीय वाद रंगण्याची शक्याता आहे.

कोण आहे गजा मारणे?

गजानन मारणेचं मुळ गाव मुळशी तालुक्यात आहे. कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये गजा मारणे याला अटक झाली होती.

या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला शिक्षाही दिली होती. त्यानंतर गजा मारणे तीन वर्ष पुण्यातील येरवडा कारगृहात होता. मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!