फॅन, एसीमध्ये कॅमेरा, लाईट सुरु ठेऊन पत्नीसोबत शारीरिक संबंध, निलेश चव्हाणचे भयंकर कारनामे उघड…

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निलेश चव्हाण याबाबत देखील पत्नीला मारहाण करणारे कारनामे समोर आले आहेत. तसेच स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केल्याबद्दल निलेश चव्हाणवर 2019 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या साहाय्याने धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल झाला आहे. यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरूममधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला.
याबाबत निलेशने मात्र उडवाउडवीची उत्तरं दिली. तसेच निलेशच्या पत्नीला घरातील एअर कंडिशनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. त्यावेळीही निलेशने उडवाउडवीची उत्तर दिली. नंतर निलेशच्या बायकोने त्याचा लॅपटॉप बघितला असता त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने रेकॉर्ड केल्याचं तिला दिसून आले.

बेडरूममधील लाईट सुरु ठेऊन शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. त्या लॅपटॉपमध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखी काही मुलींसोबतचे संबंधाचे व्हिडिओ दिसून आले. यामुळे तिला धक्काच बसला. आपला नवरा असं कसं करू शकतो, असे तिला वाटले. निलेशच्या पत्नीने याबाबत विचारले असता त्यानं घरातील चाकूने तिला धमकावलं.
तसेच तिचा गळा देखील दाबला. नंतर तिची इच्छा नसताना देखील बळजबरीने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. निलेशच्या पत्नीने निलेशच्या आई – वडिलांना आणि कुटुंबातील इतरांना याची माहिती दिली असता त्यांच्याकडून तिचाच छळ सुरु करण्यात आला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.