रात्रीची वेळ, कात्रज घाटात गोळीबाराचा थरार, नेमकं घडलं काय, पोलीस चौकशीत भयंकर माहिती उघड…


पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील कात्रज घाटामध्ये सोमवारी रात्री गोळीबाराची घटना घडली आहे.

दोघांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली होती. यामुळे एकच खळबळ उडाली. गोळीबारमध्ये जखमी झालेल्या व्यक्तीने कर्जाला वैतागून स्वतःच हा डाव रचला असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. या घटनेमध्ये जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी की, कात्रज भागात पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना कात्रज घाटामध्ये एक व्यक्ती जखमी अवस्थेत दिसला. दीपक राजू लकडे असे त्यांचे नाव आहे. त्यांना २ व्यक्तींनी कात्रज घाटात नेऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे घेऊन त्यांच्यावर गोळीबार केला, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.

असे असताना मात्र पोलिसांनी तपास केला असता दीपक लकड यांच्यावर कोणी गोळीबार केला नसल्याचे तपासातून समोर आले. त्यांनी सदरची घटना स्वतःहून घडवून आणली असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कर्ज होतं. आणि त्यांनीच ही घटना घडवून आणली आहे.

कर्ज असल्यामुळे कर्जाला कंटाळून त्यांनीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तपासात समोर आले. दिपक लकड यांच्या छातीमध्ये गोळी अडकली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!