पुढचे चार दिवस अतिमहत्वाचे, पुण्यासह राज्यभरात पाऊस थैमान घालणार
पुणे : अवकाळी पावसाने राज्यात काही दिवसांपासून थैमान घातले आहे. एप्रिलच्या शेवटीही पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वादळी पाऊस आणि गारपीट होत असली तरी उन्हाचा चटका कायम असल्याने राज्यात उन्हाच्या झळा बसत आहेत. मागच्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे राज्याचील हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने राज्यात मागच्या काही दिवसांपासून वादळी पावसासह गारपीट होत आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आज राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे पुन्हा एकदा संकट आले आहे.
वादळी पावसाला पोषक वातावरण झाल्याने आज मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, आणि विदर्भातील बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात गारपीट आणि वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.