न्यूझीलंडच्या उत्तरेला भूकंपाचे जोरदार धक्के…!
नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या उत्तरेला असलेल्या केरमाडेक बेटांवर गुरुवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.1 इतकी मोजली गेली आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे की भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या 10 किलोमीटर आत होता. शास्त्रज्ञांनी आता सुनामीचा इशाराही दिला आहे.
टर्की आणि सीरिया मध्ये भूकंप
गेल्या महिन्यात तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात 60,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर दोन लाखांहून अधिक लोक जखमी झाले होते. त्यामुळे 90 लाखांहून अधिक लोक बाधित झाले. 47 हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले. भूकंपामुळे प्रभावित झालेल्या शाळा, रुग्णालये आणि इतर वैद्यकीय, प्रसूती आणि शैक्षणिक सुविधांसह अत्यावश्यक सेवा नष्ट झाल्या आहेत.
Views:
[jp_post_view]