नववर्षाच्या सेलिब्रेशनला अडथळा; स्विगी- झोमॅटो अन् अॅमेझॉनचे डिलिव्हरी बॉय संपावर, काय आहे कारण?

पुणे: सरत्या वर्षाला निरोप देऊन येत्या नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण तयारी करत आहेत. मात्र त्यांच्या आनंदोत्सवात अडथळा येण्याची शक्यता आहे.आज स्विगी, झोमॅटो, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्डची डिलिव्हरी सर्व्हिस बंद असणार आहे. कारण या डिलिव्हरी सर्व्हिस देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. याचा फटका मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांना बसणार आहे

स्विगी, झोमॅटो, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्डची डिलिव्हरी सर्विसनीं,तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ अॅप बेस्ट ट्रान्सपोर्ट वर्कर्स यांच्या नेतृत्वाखाली हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता आणि हैदराबाद यासारख्या प्रमुख शहरांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

या संपामुळे देशभरातील १,००,००० हून अधिक डिलिव्हरी कामगार आज अॅपमध्ये लॉग इन करणार नाहीत किंवा मर्यादित काळासाठी सक्रिय राहतील. त्यामुळे याचा परिणाम आज याठिकाणी ऑनलाइन ऑर्डर करणाऱ्या नागरिकांवर होणार आहे.देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली एनसीआर, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील प्रादेशिक संघटनांनीही या संपात सहभाग घेतला आहे.

युनियनचे म्हणणे आहे की, गिग कामगारांच्या वाढत्या मागण्या असूनही त्यांच्या कामाच्या सवयी अजूनही बदललेल्या नाहीत. कंपन्या त्यांना पुरेसे पैसे देत नाहीत किंवा सुरक्षिततेची हमी देत नाहीत.दिवसरात्र ऊन, थंडी आणि पाऊस यामध्ये वेळेत वस्तू पोहोचवूनही त्यांना त्यांच्या कंपन्यांकडून अपघात विमा, आरोग्य विमा आणि पेन्शनसारखे फायदे दिले जात नाहीत. त्यामुळे हा संप पुकारला जात आहे.
