नकुल भोईर हत्येत नवा ट्विस्ट, पत्नीच नव्हे, खुनात आणखी एक सहभागी..पत्नीला साथ देणारा अटकेत, कोण आहे तो?

पुणे : गेल्या आठवड्यात दिवाळीच्या दिवशी पिंपरी-चिंचवडमध्य एक धक्कादायक हत्याकांड घडलं. चारित्र्यावर संशय घेऊन सारखं भांडण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांचा त्यांना पत्नीने ओढणीने गळा आवळून खून केला होता. यामुळे संपूर्ण शहर हादरलं.

तसेच आता या हत्या प्रकरणात धक्कादायक वळण आलं आहे. नकुल भोईर यांची हत्या त्यांच्या पत्नीने केल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, ही हत्या करताना तिसरा व्यक्ती तिथं असावा असा संशय पोलिसांना आला होता. आता या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.
सुरुवातीला त्यांच्या पत्नीनेच पतीचा खून केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, पोलिसांनी नकुल यांच्या पत्नीची चौकशी सुरू केली. त्याशिवाय, आपल्या पद्धतीने तपास सुरू केला. अखेर पोलीस तपासात या हत्येत आणखी एकाचा सहभाग असल्याचे समोर आले.

या प्रकरणात आरोपी पत्नीच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या खून प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. सिद्धार्थ पवार अस अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो मृत नकुल याची पत्नी चैताली हिचा प्रियकर आहे,
चिंचवड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली आहे. -नकुल ची पत्नी आरोपी चैताली हिचा प्रियकर सिद्धार्थ पवार याचा या गुन्ह्यामध्ये सहभाग आढळून आल्याने त्याला चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
मृत नकुल भोईर हासामजिक कार्यकर्ता होता, तर त्याची पत्नी, चैताली ही आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होती. नकुल आणि आरोपी महिलेचा काही काळापूर्वी विवाह झाला होता. मात्र नकुल चैतालीच्या चारित्र्यावर सतत संशय घ्यायचा, त्यामुळे त्यांच्यात सारखे खटके उडायचे, वादही व्हायचा. गेल्या आठवड्यात दिवाळीच्या दिवशी देखील याच मुद्यावरून नकुल व त्याच्या पत्नीचे संध्याकाळी भांडण झालं. तो वाद मिटला न मिटला तोपर्यंत रात्री पुन्हा त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. आणि चैतालीने पती नकुलचा खून केला अशी माहिती समोर आली होती.
मात्र आता चैतालीचा प्रियकर सिद्धार्थ याला पोलिसांनी अटक केली असून त्यामुळे बरीच माहिती समोर आली आहे. या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. आरोपी सिद्धार्थ पवार आणि चैताली भोईर या दोघांमध्ये प्रेम संबंध होते . तर चैतालीचा पती नकुल या प्रेम संबंधात अडसर ठरत होता. एवढंच नव्हे तर चैतालीने घेतलेल्या कर्जाची माहिती नकुलला समजल्यावर त्यांचा वाद झाला. त्यावेळी आरोपी सिद्धार्थ पवार समोरच नकुलने चैतालीला मारहाण केली.
ते पाहून सिद्धार्थला राग अनावर झाला, त्यानंतर सिद्धार्थ आणि चैताली या दोघांनी संगनमतानेच नकुल भोईर याचा ओढणीच्या साह्याने गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे याप्रकरणात फक्त चैताली नव्हे तर तिचा प्रियकर सिद्धार्थ हाही आरोपी असल्याचे समोर आले आहे. पोलीसांनी त्याला अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.