दक्षिण भारतातील पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी नवीन टुरीस्ट ट्रेन ! कोणत्या स्थळांना भेटी देता येईल घ्या जाणून ….!!


मुंबई: भारतीय रेल्वे १७ नोव्हेंबर पासून भारत गौरव ट्रेन चालवणार आहे. मुंबई येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुंबई- पुणे- सोलापूर-गुंटकल-रेनिगुंटा-रामेश्वरम-मदुराई-कन्याकुमारी-कोचुवेली कव्हर करणारी ही रेल्वे गाडी असणार आहे.

आयआरसीटीसी द्वारे चालवली जाणारी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून (दि. १७) रोजी ०४.५० वाजता सुटेल आणि मुंबई- पुणे- सोलापूर- गुंटकल – रेनिगुंटा – रामेश्वरम – मदुराई – कन्याकुमारी- कोचुवेली कव्हर करत गोलाकार मार्गावर प्रवास करुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे (दि. २५) रोजी १६.१५ वाजता पोहचणार आहे.

रेल्वेचे बोर्डिंग/डिबोर्डिंगसाठी थांबे पुढीलप्रमाणे : ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी, रेनिगुंटा (रामेश्वरम ते मदुराई मार्गे मेलपक्कम ते कुडालनगर), कन्याकुमारी, कोचुवेली आणि वरील स्थानकांवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे परत

पर्यटन वाढीसाठी गाडीचा उपयोग

भारत सरकारच्या कल्पनेनुसार, ‘देखो अपना देश आणि एक भारत श्रेष्ठ भारत’ या उदात्त पर्यटन संकल्पनांना चालना देण्याच्या उद्देशाने, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला एक गंतव्यस्थान म्हणून दाखवण्यासाठी रेल्वे मंत्रालय देशाच्या विविध भागांतून भारत गौरव पर्यटक गाड्या चालवत आहे. या थीमवर आधारित ट्रेन्सची संकल्पना भारतातील समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा देशांतर्गत पर्यटकांना तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दाखवण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

ही आयआरसीटीसी टुरिस्ट ट्रेन एक सर्वसमावेशक टूर पॅकेज असेल ज्यामध्ये ३ पर्याय आहेत- इकॉनॉमी, आराम आणि डिलक्स आणि त्यात ट्रेनचे भाडे, जेवण, मुक्काम आणि वाहतूक यांचा समावेश आहे. आयआरसीटीसी पाहुण्यांना सुरक्षित आणि संस्मरणीय अनुभव देण्यासाठी प्रयत्न करेल.

अधिक तपशीलांसाठी कृपया mwww.irctctourism.co ला भेट द्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!