सावधान! पुणेकरांनो तुमची गाडी जुनी आहे? नवे कडक नियम झाले लागू; अन्यथा थेट कारवाई…

पुणे : पुणे शहरात वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने मोठे पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात विशेष नियम लागू करण्याचा विचार सुरू असून जुन्या वाहनांवर अतिरिक्त शुल्क आकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे वाहनधारकांनी नव्या नियमांची माहिती घेणे आवश्यक ठरणार आहे. वाढत्या वायू प्रदूषणावर लगाम लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या भागात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
यामुळे जास्त प्रदूषण करणाऱ्या जुन्या वाहनांवर प्रदूषण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह वाहतूक तज्ज्ञ उपस्थित होते.पुणे शहरातील मध्यवस्तीमध्ये विशेषतः शिवाजीनगर आणि पेठ भागात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केला जात आहे.

वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी हा उपाय विचाराधीन असून अधिक प्रदूषण करणाऱ्या जुन्या वाहनांवर शुल्क आकारण्याची योजना आखली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
प्राथमिक माहितीनुसार, भारत स्टेज-3 किंवा त्यापेक्षा जुन्या इंजिन तंत्रज्ञानाच्या वाहनांना या क्षेत्रात प्रवेशासाठी दररोज विशेष शुल्क भरावे लागू शकते. संबंधित शुल्क आधी भरले नसल्यास नियम मोडणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्यांच्या मदतीने दंड आकारला जाईल. सुरुवातीला हा नियम शिवाजीनगर आणि पेठ परिसरात लागू करण्याचा विचार आहे. पुढील टप्प्यात त्याचा विस्तार शहरातील इतर भागांमध्ये करण्याचाही प्रशासनाचा विचार आहे.
अभ्यासानुसार पुणे शहरातील वायू प्रदूषणात वाहनांचा मोठा वाटा आहे. २०२० मध्ये करण्यात आलेल्या संशोधनात पुणे महानगर क्षेत्रातील सूक्ष्म कण (PM 2.5) प्रदूषणापैकी सुमारे ४६ टक्के प्रदूषण केवळ वाहनांमुळे होत असल्याचे स्पष्ट झाले. हे सूक्ष्म कण मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानले जातात. याशिवाय २०२३ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवर चालणाऱ्या सुमारे 70 टक्के वाहनांमध्ये भारत स्टेज-4 किंवा त्यापेक्षा जुने इंजिन तंत्रज्ञान असल्याचे आढळले.