तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती..


उरुळी कांचन : वर्तुळाकार (रिंग रोड) रस्ता केल्याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी सुटू शकत नाही. रिंग रोडची निविदा काढली आहे. रिंग रोडला समांतर लोहमार्ग करावा लागणार आहे. तळेगाव दाभाडे ते चाकण रांजणगावमार्गे उरुळीकांचन असा लोहमार्ग केला जाणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या तसे विचाराधीन असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे सांगितले. हा मार्ग झाल्यास पुणे स्थानकावरील ताण काम होईल, असेही ते म्हणाले आहे.

अजित पवार म्हणाले, पुणे जिल्ह्यातील वाहतुकीची समस्या गंभीर आहे. रिंगरोडशिवाय तो सोडवता येणार नाही. प्रकल्पाचा खर्च आता २५,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे आणि नवीन निविदा काढण्यात आल्या आहेत. तळेगाव दाभाडे ते चाकण आणि रांजणगाव मार्गे उरुळी कांचन असा वेगळा रेल्वे मार्ग रेल्वेशी समन्वय साधून आखला जात आहे.

दरम्यान, या नवीन मार्गामुळे चाकण व रांजणगाव मधील उद्योगांना देखील मोठा लाभ होणार आहे. पुणे-लोणावळा व पुणे- दौंड या लोहमार्गावर क्षमतेपेक्षा अधिक रेल्वेगाड्या धावत असल्याने पुणे स्थानकात दाखल होणाऱ्या प्रवासी गाड्यांना फलाट उपलब्ध होत नव्हता.

दरम्यान, यामुळे ७२ प्रवासी गाड्यांना स्थानकाच्या दोन्ही होम सिग्नलवर क्रॉसिंगसाठी थांबावं लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन यावर एक नवीन मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!