एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर! महागला की स्वस्त झाला? घरगुती सिलेंडरची किंमत किती? जाणून घ्या…


मुंबई : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस. आज १ जुलैपासून एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार १४.२ किलो एलपीजी सिलिंडर आणि १९ किलो व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

केंद्र सरकारने काही महिन्यांच्या कालावधीत व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत बदल केले आहेत. गेल्या महिन्यात जूनमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ८३ रुपयांनी कपात करण्यात आली होती.

सध्याचे प्रमुख शहरातील दर काय..?

नवी दिल्ली : घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत – ११०३ रुपये आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची किंमत १७७३ रुपये.

मुंबई : घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत – ११०२.५० रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७२५ रुपये.

कोलकाता : घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत – ११२९ रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरची किंमत १८७५.५० रुपये.

चेन्नई : घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत – १११८.५० रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरची किंमत १९३७ रुपये.

घरगुती एलपीजीच्या किमती कधी वाढल्या..?

गेल्या वर्षी ६ जुलै २०२३ रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ नोंदवली होती. आजपर्यंत देशाची राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत १०५३ रुपये, ज्यात ५० रुपये वाढ होऊन ११०३ रुपये झाली आहे. म्हणजे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती एका वर्षापासून स्थिर आहेत.

व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत…

दुसरीकडे, व्यावसायिक सिलिंडरच्या दरात चढउतार सुरूच आहे. दिल्लीत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७६९ रुपये राहिली, ज्यात मार्च २०२३ मध्ये वाढ झाली आणि दर २११९.५० रुपयांवर पोहोचली.

तर एप्रिल आणि मे मध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती अनुक्रमे २०२८ रुपये आणि १८५६.५० रुपयांवर घसरल्या. लक्षात घ्या की घरगुती सिलिंडर १४.२ किलोचे, तर व्यावसायिक सिलिंडर १९ किलोचे असते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!