रेशनसाठी ई-केवायसीची नवीन सुविधा, आता घरबसल्या अपडेट करा माहिती, जाणून घ्या संपूर्ण माहिती..

मुंबई : महाराष्ट्रातील सर्व रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी स्वस्त धान्य दुकानांवर ई-पॉस मशीनद्वारे मोफत केवायसी केले जात होते. परंतु या प्रक्रियेत अनेक समस्या उद्भवत होत्या. आता सरकारने रेशनकार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आहे.

आता रेशनकार्ड धारकांना रेशन दुकानात जाण्याची गरज नाही, तर ते घरी बसून आपल्या मोबाईलवरूनच ई-केवायसी करू शकणार आहेत. यासाठी सरकारने १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानांमार्फत धान्य वितरित केले जाते. यासाठी शासनाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी ‘मेरा ई-केवायसी’ नावाचे मोबाईल ॲप कार्यरत करण्यात आले आहे. या ॲपच्या मदतीने लाभार्थी स्वतःच आणि त्यांच्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे ई-केवायसी घरबसल्या करू शकतात.

ई-केवायसी करण्यासाठी दोन महत्त्वाची ॲप्स वापरावी लागणार आहेत – आधार फेस आरडी सेवा आणि मेरा ई-केवायसी. ही दोन्ही ॲप्स मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर, फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाच्या मदतीने झटपट आणि सोप्या पद्धतीने पडताळणी करता येते. या प्रक्रियेमुळे रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही अधिकृत सदस्य सहजपणे ई-केवायसी करू शकतो.