इराणवर नवं संकट! इस्त्रायली हल्ल्यानंतर थेट आकाशातून ‘काळा पाऊस’, नागरिकांचे आरोग्य धोक्यात…


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण आणि इस्रायलच्या युद्धाने आता पेटत रूप घेतल आहे.इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये चक्क ‘तेलाचा पाऊस’ पडत असून संपूर्ण शहर काळ्या धुराच्या विळख्यात अडकले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य आता धोक्यात आले आहे.

अमेरिका आणि इस्त्राईलकडून आता इराणच्या तेल डेपोला टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यानंतर मोठी आग पसरत आहे., इराणची राजधानी तेहरानमध्ये पडलेल्या पावसाने नागरिकांची झोप उडवली आहे. हा पाऊस पाण्याचे थेंब नसून तेलाचे अंश घेऊन आला आहे, ज्यामुळे शहरातील इमारती, वाहने आणि रस्ते काळे पडले आहेत.

ईशान्य तेहरानमधील अघदासिए तेल गोदाम, शहारन ऑईल डेपो आणि कारजमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर इस्रायल कडून हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात 4 टँकर चालकांचा मृत्यू झाला असून, लागलेली आग विझवण्यासाठी अनेक तास लागले. या आगीतून निघालेल्या प्रचंड काळ्या धुरामुळे आकाशात ढग जमा झाले आणि त्यातून ‘तेलाचा पाऊस’ पडला.

या पावसात हायड्रोकार्बन, सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईड्सचे प्रमाण जास्त असल्याने तो अत्यंत विषारी आहे.त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, खिडक्या ओल्या कापडाने बंद कराव्यात आणि पावसाच्या संपर्कात आलेली कपडे त्वरित बदलावीत. यामुळे श्वसनाचे त्रास आणि त्वचेची जळजळ होऊ शकते. असे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!