मेकअप करताना ‘या’ चुका कधीही करू नका


उरुळी कांचन : मेकअप करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. जर हे नियम पाळले नाही तर शरीराचे म्हणजे त्वचेचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे मेकअप करताना या चुका कधीही करू नका.

नेहमी वॅक्सिंग करताना चांगल्या प्रॉडक्टचा वापर करा. केवळ पैसे वाचावे म्हणून कमी किंमतीचे प्रॉडक्ट विकत घेऊ नका. यामुळे सर्वात जास्त नुकसान त्वचेचं होऊ शकतं. वॅक्सला योग्य तापमानात गरम करणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर त्वचा जळून त्यावर काळे डाग पडू शकतात. वॅक्स करण्यापूर्वी या गोष्टी नक्की विचारात घ्या.

लिपस्टिक एवढी गडद लावू नका की ती ओठांबाहेर येईल. जर असं होत असेल तर लिपस्टिकचा एकच कोट लावा शिवाय तुम्ही लिप ग्लॉस किंवा लिप बाम वापरू शकता. यामुळे लिपस्टिक खूप वेळ टिकून राहील.

उन्हाळ्यात मेकअप करताना त्वचेशी मिळतंजुळतं फाउंडेशन लावा. जसं वय वाढतं तशी त्वचा पातळ होऊ लागते. म्हणून अशा वेळेस खूप जास्त फाउंडेशन लावल्यामुळे चेहऱ्यावर ताण येतो आणि त्वचा ढिली पडण्यास सुरुवात होते. उन्हाळ्यात तुम्ही लाईट फाउंडेशन किंवा मूस लावू शकता. मात्र नेहमी लक्षात ठेवा की ते चेहऱ्यावर व्यवस्थित ब्लेंड झालं आहे ना हे जरूर पाहा.

जर तुम्हाला कन्सीलर लावायचं आहे तर चेहऱ्यावर मसाज करून ते लावा. कन्सीलर स्पंज किंबा ब्रशच्या मदतीने चांगलं ब्लेंड होत नाही म्हणून चेहऱ्याच्या प्रत्येक भागावर चांगलं मसाज करून तुम्ही कन्सीलर लावलं पाहिजे. यामुळे तुमचा लूक नॅचरल दिसेल आणि त्यानंतर तुम्ही फाउंडेशन लावू शकता.

ग्लिटर लावताना ते हलकंसं आणि टचअप करण्यासाठी लावलं पाहिजे. याचा जास्त वापर तुमचा मेकअप बिघडू शकतो. यामुळे डोळ्यांच्या जवळ रेषा आणि सुरकुत्या दिसू लागतात. जर तुम्हाला टचअप द्यायचा असेल तर बोटांच्या मदतीने तुम्ही हे लावू शकता. उन्हाळ्यात मात्र ग्लिटरचा वापर करू नका. तुमचे डोळे तेव्हाच सुंदर दिसतील जेव्हा तुमच्या आयब्रोज सुंदर असतील म्हणून आयब्रोजना थोडा टचअप देण्याची गरज आहे. मेकअप करताना तुम्ही आयब्रो पेन्सिलने त्यांना योग्य आकार व रंग देऊ शकता. यामुळे त्यांची फिनिशिंग उठून दिसेल.

काही वेगळ्या उपयुक्त टिप्स

– आज बाजारात अशी अनेक सौंदर्य उत्पादनं आहेत, ज्यांचा वापर एकापेक्षा जास्त कामांसाठी केला जाऊ शकतो. लिपस्टिकचा वापर तुम्ही चीक टींट म्हणून करू शकता. तसंच बीबी क्रीम म्हणून तुम्ही कन्सीलर वापरू शकता. यामुळे खूप प्रॉडक्ट घेण्यापासून तुम्ही वाचू शकाल.

– जेवण बनवताना दालचिनी, आलं, काळी मिरी यांचा जरूर वापर करावा. हे मसाले आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

– तुम्ही दिवसभर कितीही व्यस्त असलात तरी नातेवाईक आणि मित्रमैत्रिणीशी भेटणं कधी सोडू नका. त्यांना भेटल्यामुळे तुम्हाला सतत काहीतरी नवीन शिकायला मिळतं.

– केसांना शाम्पू केल्यानंतर कंडीशनर लावणं स्त्रियांबरोबरच पुरूषांसाठी सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!