आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने दोघांना समोरासमोर चिरडले ! एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
राजगुरूनगर : खेड -आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याच्या बेफामपणे कार चालवून दोघांना चिरडल्याची घटनेने पुणे जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे घडलेल्या या प्रकरानंतर संतप्त जमावाने पोलिस ठाण्यासमोर गर्दी केल्याची माहिती मिळत आहे.
ओम सुनिल भालेराव (वय १९) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात रविवारी मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात घडला आहे.
मयुर मोहिते हा आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या आहे. तो पुणे-नाशिक महामार्गावरून कारने पुण्याच्या दिशेने येत होता. तो विरुद्ध दिशेने सुसाट गाडी चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या भरधाव कारने धडक दिली.
अपघात इतका भीषण होता,की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. त्यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठ्या संतापाचे वातावरण आहे.