नेपाळला ५.२ रिश्टर तीव्रतेचे भूकंपाचे धक्के…!
बाजुरा : गेल्या काही दिवसापासून भूकंपाची मालिका सुरूच असताना आज (दि.22) नेपाळ मधील बाजुरा भागात दुपराच्या 1:45 च्या सुमारास 5.2 रिस्टर तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की ते उत्तराखंड, दिल्ली आणि उत्तर प्रदेश मधील काही भागामध्ये देखील बसले आहेत. अशी माहिती राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राने दिली आहे.
या भूकंपाने उत्तराखंडमध्येही ४.४ रिश्टरचे धक्के जाणवले. तर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांना देखील भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. नेपाळमधील जुमलापासून ६९ किमी अंतरावर १० किमी खोलीवर असल्याचे राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने सांगितले आहे.
दरम्यान नेपाळमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वारंवार भूकंप होत आहेत. यापूर्वी 24 जानेवारी रोजी नेपाळमध्ये 5.8 तीव्रतेचा भूकंप झाला होता. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये, नेपाळमध्ये 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला होता. दरम्यान डोटी जिल्ह्यात घर कोसळून झालेल्या घटनेत किमान सहा जणांचा मृत्यू झाला. या भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआर भागातही जाणवले होते.