Nepal Bus Accident : ब्रेकिंग! जळगावमधील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये भीषण अपघात, १४ जणांचा मृत्यू…

Nepal Bus Accident : महाराष्ट्रातील ४० पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात राज्यातील १४ प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे.
या बसमध्ये ३० प्रवासी होते. १३ जणांना वाचविण्यात यश आले आहे. हे सर्व भाविक भुसावळचे आहे. यामध्ये ३१ जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात बस कोसळल्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक झाले आहे. Nepal Bus Accident
शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. अयोध्या येथे आयोजित शुरामकथेसाठी जळगाव जिल्ह्यातील काही भाविक गेले होते. कथेची सांगता झाल्यानंतर काही भाविक दोन बसेसमधून काठमांडूकडे निघाले. वाटेत पोखरा ते काठमांडू दरम्यान बस दरीत कोसळली.
यात १४ जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. हे सर्व जण भुसावळ तालुक्यातील वरणगाव, सुसरी, पिंपळगाव खुर्द, गोळेगाव, तळवेल, आचेगाव या गावचे रहिवासी आहेत.