NEET : बंगाल, कर्नाटकमध्ये नीट विरोधात ठराव मंजूर, देशभरात चुकीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त…


NEET : ‘नीट’ या वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहार उघकीस आल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनेक राज्य सरकारांनी ही परीक्षा रद्द करण्याबाबत चर्चा केली आहे. दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने नीट विरोधात ठराव मंजूर केला.

हा वैद्यकीय शिक्षण आणि कौशल्य विकास राज्यमंत्री शरण प्रकाश पाटील यांनी सादर केला. भाजप आणि जेडीएसच्या जोरदार विरोधानंतरही गुरुवारी (ता.२५) हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतच ‘नीट’ला चुकीचे ठरवून या परीक्षेतून सूट देण्याची आणि सीईटी सिस्टम पुन्हा लागू करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली होती. दरम्यान, नीट परीक्षेतील गैरव्यवहाराने शिक्षण व्यवस्थेला हादरवून सोडले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टानेही नीट पेपर रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली. NEET

‘वन नेशन, वन इलेक्शन’ला विरोध : कर्नाटकातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विरोधात ठरावही मंजूर केला. ही व्यवस्था लोकशाहीसाठी चांगली नाही, असे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे.

देशात एकाचवेळी निवडणुका व्हाव्यात, कारण त्यामुळे पैसा आणि वेळ वाचेल, अशी मागणी भाजपकडून अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र असे झाले तर निवडणुकीच्यावेळी राष्ट्रीय मुद्द्यांमध्ये स्थानिक मुद्दे पुढे येणार नाहीत, असे या ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या विरोधकांचे म्हणणे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!