एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी..


मुंबई : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चेला उधाण आले होते.

अखेर एनडीएने आपल्या उमेदवाराची घोषणा केली असून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना अधिकृतरित्या उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. रविवारी (१७ ऑगस्ट) झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करताना सर्व सदस्यांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले

सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत त्यांनी झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. तसेच, मार्च २०२४ ते जुलै २०२४ दरम्यान त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. याच काळात त्यांनी पुदुचेरीचे उपराज्यपाल म्हणूनही काम पाहिले. एप्रिल २०२६ मध्ये होणाऱ्या तमिळनाडूच्या निवडणुकांमध्ये राधाकृष्णन यांच्या निवडीमुळे एनडीएला फायदा होऊ शकतो अशी चर्चा आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयासाठी ३९२ मतांची आवश्यकता आहे, तर एनडीएकडे ४२२ मते आहेत. त्यामुळे राधाकृष्णन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!