पूर्व हवेलीत राष्ट्रवादीत उभी फूट अटळ! थोरल्या धाकट्या पवारांसाठी समर्थकांचे पाठबळ..!!


जयदीप जाधव

उरुळीकांचन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पूर्व हवेली तालुक्यातही पक्षात दोन गट पडण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी भाजपच्या गोटात जाऊन शपथविधी घेतल्यानंतर पक्षाचे तरुण कार्यकर्ते हे उघडपणे तर बुजुर्ग नेते छुप्या पद्धतीने त्यांच्या भूमिकेचे समर्थन करताना दिसत आहे.

अजित पवार यांच्या शपथविधीनंतर पूर्व हवेलीत अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना शुभेच्छा देण्या साठी मुंबईत रांगा लावल्या आहेत.त्यामुळे भविष्यात या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडण्याचे अटळ झाले आहे.

राष्ट्रवादी चे नेते अजित पवार यांनी शिंदे व फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने या निर्णयाने पूर्व हवेलीत भूकंप घडला आहे. या निर्णयाने पक्षात संमिश्र असे वातावरण तयार झाले असून काही तरुण कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या पाठिशी आहेत. तर काही शरद पवार यांच्या पाठिशी आहे.

मात्र या बदलत्या राजकीय समिकरणांत अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर मुंबई येथे त्यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे.तर काहींनी शुभेच्छा फलक झळकावून अजित पवार यांना एकप्रकारे समर्थन दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समिकरणांत पूर्व हवेली तालुक्यात काही वेगळी परीस्थिती नसून पक्षात उभी फूट पडण्याचे अटळ झाले आहे.

भाजपच्या सरकारमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री घेतल्यानंतर पक्षावर दावा ठोकरणाऱ्या अजित पवार यांचा पूर्व हवेली तालुक्यात प्रत्येक गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आहे. ते स्वतः हा १९९२ पासून लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर ते पूर्व हवेली तालुक्यात सक्रिय आहेत.

त्यांना तालुक्यातील कृषी, सहकार , शिक्षण क्षेत्रातील पूरीपूर्ण माहिती आहे.त्यांनी गेली तीन दशके सातत्याने तालुक्यातील विकासकामे उद्गाटने , भूमिपूजन तसेच सहकार क्षेत्रातील अनेक कार्यक्रमांत हजेरी लावली आहे. अगदी तरुण सरपंचा पासून ते खाजगी कार्यक्रमांत ते आवर्जून उपस्थिती लावत आहे.

त्यामुळे तालुक्यातील त्यांचा जनसंपर्क कायम आहे. त्यामुळे राष्ट्रवादी च्या फुटीनंतर त्यांच्या संपर्कातील हा सर्व वर्ग हा अजित पवार यांच्या पाठिशी दिसत आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांना मानणारा जुना वर्ग हा आजही शरद पवार यांच्या पाठिशी असताना दिसत आहे. त्यांच्या भूमिकेशी सहमत दर्शविणारा एक वर्ग ही ठिकाणी कार्यरत आहे.

राष्ट्रवादी च्या फुटीनंतर शरद पवार यांना पाठबळ देणारा वर्ग या ठिकाणी पाहिला मिळत आहे. प्रतिकुल संघर्षाच्या स्थितीत शरद पवार यांचा असणारा दृडआत्मविश्वास हा तरुण वर्गाला मोहित करत असल्याने राष्ट्रवादीत एक फळी त्यांच्या पाठिशी उभी राहत असल्याचे एक चित्र तालुक्यात आहे.

खासदार , आमदारांची होणार कसरत!

राष्ट्रवादी त फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी चे खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार हे या भागाचे प्रतिनिधित्व करीत आहे. या दोघांनी शरद पवार यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना संघटनेत उभी फूट पडू नये म्हणून कार्यकर्त्यांशी मनधरणी करावी लागणार आहे. तालुक्यात अजित पवार यांना माननारा मोठा वर्ग असल्याने त्यांसाठी पुढील काळ हा डोकेदुखी ठरु शकतो अशी शक्यता दिसत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!