दौंड नगरपरिषदेत राष्ट्रवादीचा कमबॅक! राष्ट्रवादीच्या दुर्गादेवी जगदाळेंचा ५,७१२ मतांनी दणदणीत विजय…

दौंड : दौंड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या दुर्गादेवी जगदाळे यांनी ५,७१२ मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
माजी आमदार रमेश थोरात व माजी जिल्हा परिषद वीरधवल जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीने भाजप आमदार राहुल कुल व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारीया यांच्या वर्चस्वाला दौंडमध्ये सुरुंग लावण्यात यश मिळवले आहे.
दौंडच्या नगराध्यक्ष पदासह एकूण २६ जागांचा आज निकाल जाहीर करण्यात आला.या निकालात पहिल्याच फेरीत जगदाळे यांनी ९६३ मतांची आघाडी घेतली आणि ही आघाडी अंतिम निकालापर्यंत कायम राखत ५,७१२ मतांनी विजय मिळवला. तर भाजप पुरस्कृत नागरी हित संरक्षण मंडळाने १७ जागांवर विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

Views:
[jp_post_view]
