राष्ट्रवादीची ‘घडी’ विस्कटली ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये थेट भाजपात प्रवेश करणार योगेश क्षीरसागर?

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर असताना राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर सर्वात मोठा धक्का अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसला असून योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा दिला असून पक्षाला रामराम केला असल्याची माहिती समोर आली आहे. आता योगेश क्षीरसागर भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची घडी विस्कटली असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी काल राजीनामा दिला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षात स्थानिक पातळीवर कुठल्याच निर्णय प्रक्रियेत आपल्याला घेतले जात नसल्याची नाराजी व्यक्त केली. यानंतर ते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते भाजपमध्ये आजच पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान योगेश क्षीरसागर यांनी याबाबत असे म्हटले की, काल मी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मी केलेल्या कामाची दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे मी राजीनामा दिला आहे. विधानसभेला माझा पराभव झाल्यानंतर पक्षातीलच लोक खेळी करू लागले. याबाबतची पक्षश्रेष्ठींना मी वेळोवेळी माहिती दिली होती. परंतु दखल घेतली गेली नाही म्हणून मी काल राजीनामा दिला आहे. पुढील दिशा आणि निर्णय लवकरच आम्ही जाहीर करू. मात्र ते भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

