राष्ट्रवादीच विलीनीकरण होणार! ‘दादांची इच्छा पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा’; शरद पवारांचा ग्रीन सिग्नल…


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी असं म्हटलं की, दोन राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात ही दादांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी अशी आमची इच्छा आहे, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार यावर शिक्कामोर्तब झाल आहे. जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात याची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत काल रात्री बारामतीमध्ये बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, सुनेत्रा पवार यांनी बैठकीला उपस्थिती न लावता मुंबईच्या दिशेने वाटचाल केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या विलिनिकरणाला शरद पवार यांनी ग्रीन सिग्लन दिला आहे. गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती अशी देखील माहिती समोर आली आहे.

दरम्यान 17 जानेवारीला झालेल्या बैठकीत विलीनीकरणाची चर्चा झाली अशी माहिती देखील शरद पवार यांनी दिली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी 17 जानेवारीला गोविंद बागेत शरद पवार,अजित पवार, जयंत पाटील,शशिकांत शिंदे यांच्यासह दोन्ही गटातील नेत्यांची उपस्थिती होती. आता अजित पवारांची इच्छा पूर्ण व्हावी अशी इच्छा आमची असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!