Ncp mlas disqualification case : मोठी बातमी! राष्ट्रवादी कोणाची? आता आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय…
Ncp mlas disqualification case : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निकाल जाहीर करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. राहुल नार्वेकर आता १५ फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात निकाल जाहीर करु शकतात.
राहुल नार्वेकर यांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तीन आठड्यांचा वेळ मागितला होता. पण वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी याला विरोध केला. वेळ वाढवून मागणे हे नेहमीच होत आहे, त्यामुळे एकच आठवड्याची मुदत द्यावी असे मनु सिंघवी म्हणाले. सर्वोच्च न्यायालायने नार्वेकरांना तीन नाही, दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सुप्रीम कोर्टात तीन आठवड्यांचा वेळ मागण्यात आला होता. मात्र, अभिषेक मनू सिंघवी यांनी आक्षेप घेत केवळ एका आठवड्याची मुदतवाढ देण्यात यावा, असा युक्तिवाद केला. मात्र, सुप्रीम कोर्टाने १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वी राहुल नार्वेकर यांना ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश दिले होते. Ncp mlas disqualification case
आता राहुल नार्वेकर यांच्याकडून सुप्रीम कोर्टात ३१ जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करु, पुढील तीन आठवड्यांचा वेळ निकालाचे लेखन करण्यासाठी मिळावा, अशी विनंती सुप्रीम कोर्टात केली होती. त्यानुसार राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने १५ फेब्रुवारी पर्यंत वेळ दिला आहे. आता या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.