बीड प्रकरणात लक्ष घातलं, तर आरोपीला अटक का केली नाही?? अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या आमदाराने सुनावलं…


बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने जिल्हाच नव्हे तर सगळं राज्य ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अजूनही फरार आहेत. या प्रकरणातील सगळे आरोपी आणि मास्टरमाईंड अटकेत नसल्याचे संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या बीडमध्ये निषेध मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या आधीच अजित पवार गटाच्या नेत्याने अजितदादांना घेरलं आहे. बीडच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी लक्ष घातलं आहे, असं सांगितले जात आहे.

जर या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे तर खंडणी आणि हत्येतील आरोपी मोकाट कसे? त्यांना अजून अटक का नाही? असा सवालच अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी विचारला आहे.

आमदार प्रकाश सोळंके यांनी संवाद साधताना हा सवाल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे, असं म्हणतात. मग अद्यापही आरोपी आणि खंडणीखोरांना अटक नाही? राजाश्रय असल्याशिवाय या गोष्टी होतात का? एक आरोपी १८ -१८ दिवस फरार राहतो आणि पोलिसांना त्यांना पकडता येत नाही. खून करणाऱ्याला पकडता येत नाही. खंडणी मागणाऱ्याला पकडता येत नाही. हे काही नॉर्मल आहे का? यात कुणाचा तरी दबाव आहे, त्याशिवाय हे होणार नाही, असा हल्लाच प्रकाश सोळंके यांची चढवला.

बीड जिल्ह्यात पोलीस यंत्रणा हाताशी घेऊन खंडणी वसूल करण्याचं काम झालं आहे. याला कोण जबाबदार आहे? या सर्व प्रकरणामागे कोण आहे? हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी ठरवलं पाहिजे.

या प्रकरणामागे राजकीय समर्थन असल्याशिवाय अशी प्रकरणं होत नसतात. याला निश्चितपणे सत्तेवरील माणसाचा आशीर्वाद असल्याशिवाय हे प्रकरणं होत नाही. त्यामुळे फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी या बीड जिल्ह्याकडे लक्ष घ्यावे.

मागच्या दोन वर्षात किती खून झाले? खंडणी घेतल्या? किती अवैध धंदे झाले? किती वाळूचा धंदा झाला हे तातडीने तपासलं पाहिजे. १८ दिवस झाले खून होऊन. उद्या मोर्चा निघणार आहे. सामान्य लोकांचा आक्रोश आहे. आरोपीला अटक होत नाही हे बीड जिल्ह्याचं दुर्देव आहे, असंही ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!