राष्ट्रवादीला घरचा आहेर ! राष्ट्रवादी चे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे भाजप प्रवेशाचे वक्तव्य…!


बीड : माजलगाव मतदारसंघातील मतदारांची इच्छा असेल तर आगामी काळात भाजपमध्ये प्रवेश करू, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

माजलगाव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी शेतकऱ्यांच्या विशिध प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी सोळंके महाविद्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हे विधान केले आहे. याच पत्रकार परिषदेत आमदार प्रकाश सोळंके यांना पत्रकारांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला होता. त्या वेळी आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव मतदारसंघातील माझ्या मतदारांची तशी इच्छा असेल तर भाजपतही जावू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली होती.

दरम्यान, पवारांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले प्रकाश सोळंके यांच्या या विधानाने राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मला बदनाम करण्याचे षडयंत्र : सोळंके
माजलगाव मतदार संघाचा आमदार असल्याने मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांना मतदारसंघाच्या विकासासाठी भेटावेच लागते. मला राजकीय भविष्यासाठी राजकारणामध्ये अनेक राजकीय पक्षाचे पर्याय आहेत. परंतु भारतीय जनता पक्षातील लोकांना माझी भीती वाटते. विनाकारण माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही सुरू असलेली चर्चा मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!