NCP MLA Disqualification : ब्रेकिंग! राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवार यांना मोठा धक्का, विधानसभा अध्यक्षांकडून निकाल जाहीर…

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. त्यानुसार अजित पवार यांच्याकडे विधीमंडळात बहुमत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचीच आहे, असे नार्वेकर म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी निकाल वाचन करत आहेत. यावेळी त्यांनी अजित पवार गटाच्या आमदारांना पात्र ठरवले आहे. तसेच त्यांनी शरद पवार गटाची मागणी फेटाळली आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी काही गोष्टींवर भाष्य केलं. या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. मात्र राष्ट्रवादीत दोन गट तयार झालेले आहेत. प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्री वर मत नोंदवत आहे, असं सांगतानाच जून 2023 पर्यंत शरद पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. NCP MLA Disqualification
त्यापूर्वी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामाही मागे घेतला होता, असं राहुल नार्वेकर यांननी म्हटलं आहे. अजित पवार गट मूळ राजकीय पक्ष आहे. संख्याबळाच्या आणि पक्षीय संरचनेच्या दृष्टीने अजितदादा यांचा पक्षच मूळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.