इंडिया नावावरुन सरकारला अडचण काय.? राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांचा थेट मोदी सरकारवर निशाणा..
जळगाव : इंडिया नाव काढण्याबाबत आम्हाला माहीती नाही, मात्र इंडिया हे नाव हटविण्याचा कोणाला अधिकार नाही, तसेच हे नाव कोणीही हटवू शकत नाही.
देशाच्या निगडित असलेल्या इंडिया नावाबाबत सरकार आणि सरकारशी संबंधित पक्षाच्या लोकांमध्ये एवढी अस्वस्थता का आहे? हे मला समजत नाही, असे सांगत उद्याच्या इंडिया बैठकीत यावर चर्चा करू अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर असून शहरातील सागर पार्क येथे जाहीर सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
सुरुवातीला राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केल्यानंतर अनेक विषयांवर प्रतिक्रिया दिली. यात इंडिया हे नाव काढण्यावरून सध्या केंद्र सरकारच्या हालचाली सुरु असल्याच्या चर्चा आहेत.
यावर शरद पवार यांनी केंद्र सरकारला इशारा देताना ‘इंडिया हे नाव हटवायचा कुणाला अधिकार नाही, हे नाव कोणीही हटवू शकत नाही’ देशाच्या निगडित असलेल्या इंडिया नावाबाबत सरकार आणि सरकारशी संबंधित पक्षाच्या लोकांमध्ये एवढी अस्वस्थता का आहे? हे मला समजत नाही, असंही शरद पवार म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून भारत देशाशी संबंधित असलेले इंडिया हे नाव काढण्याबाबत चर्चा सुरु आहे. यानुसार इंडिया हे नाव काढण्यासाठी विशेष अधिवेशन घेतले जाईल, ते नाव हटवण्यासाठी केंद्राकडून आणि भाजपकडून मागणी केली जात आहे.
यावर शरद पवार मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. इंडिया हे नाव हटवायचा कुणाला अधिकार नाही, हे नाव कोणीही हटवू शकत नाही, असा इशाराच पवार यांनी दिला आहे. उद्या इंडिया आघाडीत सहभागी असणाऱ्या पदाधिकारीची बैठक होणार असून यावर चर्चा करू असंही पवार म्हणाले.