NCP Hearing : मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत उत्तर द्या, सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांना निर्देश…
NCP Hearing : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावरून वाद सुरु झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले.
त्यात निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले.याविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. याप्रकरणी शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला महत्वाचे निर्देश दिले आहे. NCP Hearing
या प्रकरणात अजित पवार गटाने दोन आठवड्यात उत्तर सादर करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे. तसेच अजित पवारांच्या उत्तरावर जर शरद पवार यांना प्रतिवाद सादर करायचे असल्यास एक आठवड्यात शरद पवारांनी ते दाखल करावे, असेही कोर्टाने म्हंटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑगस्टला होणार आहे.