Nawab Malik : मोठी बातमी! नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल…
Nawab Malik : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक हे वैद्यकीय कारणामुळे जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहे. पण आज अचानक नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली आहे.
शनिवारी दुपारी नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याची माहिती त्यांची मुलगी सना मलिक हिने दिली. त्यानंतर त्यांना कुर्ला येथील रुग्णालयात आप्तकालीन कक्षात दाखल करण्यात आले आहे.
डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. त्यांना श्वसनासंदर्भात त्रास होऊ लागल्यानंतर ते रुग्णालयात आले. मलिक यांच्यावर आता कुर्ला येथील क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, ईडीने २०२२ मध्ये नवाब मलिक यांना गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून नवाब मलिक तुरुंगात होते. Nawab Malik
त्यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये ते अटीशर्तीसह जामिनावर तुरुंगाबाहेर आले होते. पण प्रकृतीचे कारण देत त्यांना जामीन मिळाला आहे. आज अचानक त्यांची प्रकृती बिघडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडानंतर नवाब मलिक हे अधिवेशनात सत्ताधारी गटात बसले होते. त्यावरुन त्यांच्यावर खूप टीका झाली होती. जरी ते तुरुंगाबाहेर असले तरी ते सार्वजनिक कार्यक्रमात फारसे दिसले नाहीत. त्यानंतर आता त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे समोर आले असून डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे.