Nawab Malik : नवाब मलिक यांना मोठा दिलासा! सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय..


Nawab Malik मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा जामीनाला ३ महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी दोन महिन्यांसाठी जामीन दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. Nawab Malik

फेब्रुवारी २०२२ मध्ये ईडीनं गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर नवा मलिकांनी प्रकृती अस्वास्थतेचं कारण देत अनेकदा जामीनासाठी अर्ज केला होता. Nawab Malik

गेल्या वर्षभरापासून मलिक कोर्टाच्या परवानगीनं कुर्ल्यातील खासगी रूग्णालयात घेत होते. मलिकांनी बऱ्याचदा जामीनासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळण्यात आला होता.

अखेर ११ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने मलिकांना मोठा दिलासा देत, वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला होता. जामीनाची मुदत संपत असल्यामुळे मलिकांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज त्याप्रकरणी सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलासा देत नवाब मलिकांच्या जामीनाला मुदतवाढ दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!