Navneet Rana : नवनीत राणा यांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय, निवडणूक लढवता येणार का?

Navneet Rana : नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च शिक्कामोर्तब झाला आहे. नवनीत राणा जात प्रमाणपत्र प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठाने याप्रकरणी निकाल दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आणि नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे.
गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणी वेगवेगळ्या न्यायालयांत सुनावणी चालू होती. मात्र आता ही सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालयानं आज (ता.४) आपला निर्णय जाहीर केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र २०२१ मध्ये अवैध ठरवले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली होती. Navneet Rana
तसेच, बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तीवाद २८ फेब्रुवारीला पूर्ण झाला. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं याप्रकरणाचा निकाल राखून ठेवला. आज याप्रकरणी अंतिम निकाल जाहीर केला आहे.