राष्ट्रवादी पक्ष म्हणजे घोटाळेबाज पक्ष! पंतप्रधान मोदी यांनी थेट घोटाळ्यांचा आकडाच सांगत शरद पवारांवर केली जोरदार टीका..


भोपाळ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांचे नेहेमी कौतुक करत असतात. असे असताना आता मात्र त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर जळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप आहेत.

महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध उत्खनन घोटाळा, यांची यादी खूप मोठी आहे. या पक्षाच्या घोटाळ्यांचे मीटर डाऊन होतच नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केली.

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय जनता दल, द्रविड मुन्नेत्र कळघम, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरील घोटाळ्याच्या आरोपांची यादी वाचून दाखविली. आरजेडीचे घोटाळे आहेत. यात चारा घोटाळा, अलकतरा घोटाळा, शेड घोटाळा, महापूर दिलासा निधी घोटाळा आहे.

डीएमकेवर 1.25 लाख कोटींची मालमत्ता बेकायदेशीरपणे बनवल्याचा आरोप आहे. तृणमूल काँग्रेसवर 23 हजार कोटींचा घोटाळा, रोझव्हॅली घोटाळा, शारदा घोटाळा, बकरी घोटाळा, कोळसा तस्करी घोटाळा असे आरोप आहेत, असेही ते म्हणाले.

भोपाळ येथील मेरा बूथ-सबसे मजबूत या भाजपच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी इतर विरोधी पक्षांवरही जोरदार टीका केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!