नाशिकचा हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा मानकरी; चांदीच्या गदेसह दोन बक्षीस जिंकली

पुणे: पुण्यातील मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाशिकचा हर्षवर्धन सदगीर हा 68 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारा सातवा कुस्तीपटू ठरला आहे.

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड यांच्यात अत्यंत सुरक्षित लढत झाली.हर्षवर्धनने महेंद्र याच्यावर 4-2 अशा फरकाने विजय मिळवला. यासह हर्षवर्धनची महाराष्ट्र केसरी गदा पटकावण्याची ही एकूण दुसरी वेळ ठरली. हर्षवर्धन दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी गदा जिंकणारा एकूण सातवा कुस्तीपटू ठरला. तर महेंद्र गायकवाड याचं यंदाही महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न भंग झालं.
विशेष म्हणजे यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एकाच गुरूच्या दोन शिष्य मध्ये लढत झाली. पैलवान काका पवार यांच्या तालमीतील महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर हे दोघे मल्ल आहेत.महेंद्रने आक्रमक होत 1 गुण मिळवला आणि आपलं खातं उघडलं. महेंद्रने हा आक्रमकपणा कायम ठेवत दुसरा गुण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र हर्षवर्धनने महेंद्रचा डाव उलटावून लावला.

हर्षवर्धन या अंतिम फेरीत यशस्वी ठरला. हर्षवर्धनने मानाच्या चांदीच्या गदेवर आपली मोहोर उमटवली. हर्षवर्धन जिंकताच मॅटवर त्याच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली. हर्षवर्धनला त्याच्या चाहत्यांनी त्याला खांद्यावर उचलून घेतलं आणि जल्लोष केला.