खरात प्रकरणानंतर नाशिक पुन्हा हादरलं! IT कंपनीत टीम मॅनेजरकडून तरुणींवर अत्याचार, 5 नराधमांना अटक

पुणे: महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातचे नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच आता नाशिकमधील हाय प्रोफाईल असलेल्या आयटी कंपनीत टीम मॅनेजर आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून तरुणीवर अत्याचार झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील आयटी कंपनीत कामाला असलेल्या 18 ते 25 वयोगटातील तरुण मुलींचे लैंगिक, मानसिक शोषण आणि विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
संबंधितांनी कंपनीतील तरुणींना करिअरची भीती दाखवून किंवा पदाचा गैरवापर करून या मुलींवर अत्याचार करण्यात आले.आता खरात प्रकरणासारखी या प्रकरणाची देखील व्याप्ती मोठी असून यात 20 ते 25 मुली बळी पडल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नाशिक पोलीस आयुक्तांनी संदीप मिटके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

या टीमच्या अंतर्गत कंपनीतील सहकाऱ्यांची आणि टीम मॅनेजरची कसून चौकशी केली जात आहे.या प्रकरणात एकूण 6 आरोपी असून 5 पुरुष आणि एका महिलेचा सहभाग आहे. 5 पुरुष आरोपींना अटक असून एक महिला आरोपी अद्याप फरार आहे. पाचही आरोपीना आज कोर्टात हजर करण्यात आलं आहे. या घटनेमुळे तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.